या ३९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका वर्षाअखेर होणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत, नेवासा, शेवगाव, अकोले आणि श्रीरामपूर या पाच तालुक्यांतील ३९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी व रिक्त पदांच्या निवडणुकीसाठी राबवण्यात येणाऱ्या मतदारयादी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे. 


Loading...
१७ डिसेंबर रोजी या ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्धी करण्यात आल्यानंतर वर्षाखेरीस या ग्रामपंचायतींच्या गाव कारभाऱ्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीपूर्व मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. 

येत्या १० डिसेंबर रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, १० ते १४ डिसेंबरपर्यंत यावर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. त्यानंतर १७ डिसेंबर रोजी प्रभागनिहाय मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने सूचित करण्यात आले आहे..


तालुकानिहाय ग्रामपंचायती.

कर्जत- राशीन, जळगाव, नवसरवाडी, शिंदे, निंबोडी, तोडकरवाडी, सोनाळवाडी, सीतपूर, बिटकेवाडी, खातगाव, काळेवाडी, लोणी मसदपूर, माही, कानगुडेवाडी, आंबिजळगाव, जळकेवाडी, परीटवाडी, देशमुखवाडी. 

नेवासा-अंतरवली, चिलेखनवाडी, धनगरवाडी, गोपाळपूर, गोगलगाव, गणेशवाडी, लेकुरवाडी आखाडा, महालक्ष्मी हिवरे, शिरसगाव, सुकळी खुर्द, तामसवाडी. शेवगाव-सालवडगाव, माळेगाव-ने, खामपिंप्री नवीन व जुनी, मंरुळूर खुर्द व बुद्रुक..


अकोले- खडकी बुद्रुक, घाटगर, कोल टेंभे. श्रीरामपूर- हरेगाव.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.