विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी उपसरपंचावर गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  कर्जत तालुक्‍यातील औटेवाडीचे उपसरपंच राहुल राजेंद्र ढवाण यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेडछाड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल आहे. 


Loading...
औटेवाडी येथील दादा पाटील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या मुलीची 30 नोव्हेंबर रोजी छेडछाड करण्यात आली. मुलीने ही घटना आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर त्या मुलीने थेट कर्जत पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला.

गौरी गणपतीच्या डेकोरेशन स्पर्धेच्या वेळी या मुलीशी ओळख झाली होती.मुलीने त्यास वेळोवेळी समज देऊनही त्याच्यात सुधारणा होत नव्हती. 30 नोव्हेंबरला पुन्हा छेडछाड झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.