अहमदनगर भाजपला काँग्रेस मुक्त भारतच्या घोषणेचा विसर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नारा दिला होता काँग्रेस मुक्त भारत, परंतु या मोदींच्या घोषणेला नगर भाजपला विसर पडला असून ती आता काँग्रेस युक्त भारत या घोषणेकडे वाटचाल करत आहे व त्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाच्या विरोधी भूमिका घेत आहे, त्यामुळे खरे भाजपवाले आमच्या बरोबर आहेत, असे प्रतिपादन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी केले. 

मनपा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रभाग ७ मधील उमेदवार अशोक बडे, कमल सप्रे, अक्षय कातोरे, रिटा भाकरे यांच्या प्रचाराचा शुभारंभ नागापूर - बोल्हेगाव येथील गणपती मंदिरासमोर करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. माजी मंत्री अनिल राठोड, नगरसेविका बडे, दत्तात्रय सप्रे, मदन आढाव आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.