कर्डीले हे दबंग आमदार आहेत. त्यांच्याकडे जादूची कांडी - पंकजा मुंडे


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांना अभिवादन करून अहमदनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यास संबोधित केले.
Loading...

पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या, कर्डीले हे दबंग आमदार आहेत. त्यांच्याकडे जादूची कांडी आहे. त्यांनी रात्रीतून काँग्रेसचे उमेदवार फोडले. भाजपमध्ये त्यांचा प्रवेश करून घेतला. हे चमत्कार फक्त कडीर्लेच करू शकतात. महापालिका झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी एकही भरीव काम नगरमध्ये केले नाही. मात्र विकास कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. 


शहरातील उड्डाणपुलाला भाजप सरकारने निधी दिला. पण, महानगरपालिका सत्ताधाऱ्यांनी ना हरकत दाखला देण्यास टाळाटाळ केली. त्यांच्यामुळेच उड्डाणपूल रखडला आहे. शहराचा विकास करायचा असेल भाजपची सत्ता पाहिजे. केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता आहे, असे त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या, देशात व राज्यातील नेतृत्व महिलांचे सक्षमीकरण करण्याचे काम करत आहे. महिलांचे प्रश्न महिलाच समजू शकते, त्यामुळे आम्ही ३५ महिलांना उमेदवारी दिली आहे. निवडणूकीत महिलांच्या मतदानाला महत्व आहे त्यामुळे महिलांनी पुढे येवून मतदान करावे आणि शहर विकासासाठी भाजपला सत्तेवर आणावे असे आवाहन केले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.