श्रीरामपूर तालुक्यात चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथील कारवाडी शिवारात एका पाच वर्षे वयाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला. 

Loading...
कारेगाव येथे काल शनिवारी कारवाडी शिवारात दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही मुलगी आपल्या बहिणीसोबत घरापासून थोड्या अंतरावर शौचासाठी गेली होती. यावेळी घरी तिची आजी होती. मुलगी घरी आल्यानंतर तिला चक्कर आली व ती खाली कोसळली. 

तिला ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने गावातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथून तिला कामगार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केली असता मुलगी मृत झाल्याचे समजले. तिच्यावर अत्याचार झाला असण्याची शक्यता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. मृत्युचे कारण स्पष्ट होत नसल्याने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथे पाठविण्यात आला. पोलीस पुढील तपास करत आहेत. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.