अकरावीतील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिक्षणासाठी शेवगाव येथे भाडोत्री खोली घेऊन राहात असलेल्या मुंगी येथील अकरावीच्या विद्यार्थिनीने आज गुरुवारी (दि.29) सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. दिपाली सुखदेव ठोंबरे (वय 16) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. आत्महत्येचे निश्‍चित कारण समजू शकले नाही. 
Loading...

यासंदर्भात नवाब कादर शेख (रा. शेवगाव, विद्यानगर) यांनी शेवगाव पोलिसांत अर्ज देऊन घटनेची माहिती दिली. दिपाली ही अर्चना सुधाकर हिंगे व रिजवाना मीर साहब बेग या एसटी कार्यालयात काम करणाऱ्या दोन मुलीसमवेत भाडेकरू म्हणून शेख यांच्या खोलीत राहत होती. सकाळी 8.45 वाजता शेख दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. तर अर्चना हिंगे व रिजवाना बेग याही कामावर गेल्या होत्या. खोलीत दिपाली एकटीच होती.

साडेनऊच्या सुमारास ऋतुजा उद्धव नरवडे ही तिची मैत्रीण तिला भेटण्यासाठी आली, तेव्हा दिपालीने पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे तिला दिसले, तिने आरडाओरड केल्यानंतर दिपालीने आत्महत्या केल्याचे समजले. शेख यांनी पोलीस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.