पुण्यात सुणासुदीला पती-पत्नीची निर्घृण हत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जादूटोणा केल्याच्या संशयावरून पती पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात घडली आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील औढे गावात मुकणे दाम्पत्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 
Loading...

मुकणे दाम्पत्य हे जादूटोणा करत असल्याचा संशय काही जणांना होता. त्यातूनच कोयत्याचे वार करून त्यांची हत्या करण्यात आली. नावसु कुणाजी मुकणे आणि त्यांची पत्नी लीलाबाई नवसु मुकाणे या दोघांना कोयत्यानं ठार मारण्यात आलं. औढे गावातली देवीची यात्रा सुरू असताना रात्रीच्या वेळेस तिघेजण मुकणे दांपत्याकडे आले आणि लीलाबाईला जादूटोणा येतो असं म्हणून त्यांच्यावर वार केले. 

दिपावलीचा सर्वत्र आनंदोत्सव सुरु असताना खेड तालुक्यात हत्यांचे सत्र सुरुच आहे पश्चिम भागातील औढे गावात दोघां पती-पत्नीची कोयत्याने डोक्यावर व अंगावर वार करुन निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

नावसु कुणाजी मुकणे वय ५५ आणि त्यांची पत्नी लिलाबाई नवसु मुकणे वय ५० अशी दोघां पती-पत्नीची नावं आहेत. दरम्यान ग्रामीण भागातही अशाच पद्धतीने निघृण हत्या होत असताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय का असाच प्रश्न निर्माण झाला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.