मोटारसायकल अपघातात माजी उपसरपंच ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पाथर्डी तालुक्यातील खांडगावचे माजी उपसरपंच संजय बन्सी गायकवाड (वय ४५वर्षे) यांचा मंगळवारी मोटारसायकल अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. याबाबतची माहिती अशी की, खांडगावचे माजी उपसरपंच संजय गायकवाड मंगळवारी दुपारी करंजी येथे आठवडेबाजारला आले होते. 


Loading...
बाजारात भाजीपाला खरेदी केल्यानंतर ते खांडगावकडे मोटारसायकल वरून जात असताना त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. त्यानंतर त्यांना तत्काळ नगर येथील खासगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र मेंदूला जबर मार लागल्याने त्यांचा रात्री दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले, असा परिवार आहे. ऐन सणासुदीच्या दिवशीच उपसरपंच गायकवाड यांचा अपघाती मृत्यू झाल्याने खांडगाव, लोहसर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.