श्रीरामपुरात वृद्ध महिलेस लाकडी दांडक्याने मारहाण.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- रस्त्यात गाडी का लावतो, असे विचारल्याने एका वृद्ध महिलेस मारहाण झाल्याची घटना श्रीरामपुरातील कारेगाव येथील घडली.
Loading...

याबाबत पोलिसांनी सांगितलेली माहिती अशी, की द्रौपदाबाई पंढरीनाथ ठोकळ (वय ६५, रा. कारेगाव) यांनी बाबासाहेब भिमराज बर्डे (वय ४२, रा. कारेगाव) याला गाडी रस्त्यात लावू नका, असे म्हटले, याचा राग येऊन बर्डे याने लाकडी दांडक्याने ठोकळ यांच्या हातावर मारले. 


यात त्या जखमी झाल्या. ठोकळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बर्डे याच्याविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ३८७/१८ नुसार भा.दं.वि. कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पवार करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.