पत्नीचा खून करून फरार झालेल्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गंगापूर तालक्यातील मांजरी शिवारात पत्नीचा खून करून पसार झालेल्या पतीने राहाता परिसरात उसाच्या शेतातील विजेच्या खांबावर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये तो गंभीर भाजला असून लोणी येथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 

Loading...
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, गंगापूर तालुक्यातील मांजरी शिवारात सोमवार 5 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात वाजण्याच्या सुमारास विजय अंबादास थोरात (वय 35) याने कापूस वेचत असलेली त्याची पत्नी ज्योती विजय थोरात (वय 30) हिचा कुर्‍हाडीने घाव घालून तसेच तिच्याच साडीने गळा आवळून खून केला व घटनास्थळावरून पसार झाला. त्याला दोन मुली व एक मुलगा असून ही त्याची दुसरी पत्नी आहे.

त्याने मंगळवारी राहाता शिवारात दंडवते यांच्या उसाच्या शेतातील विजेच्या पोलावर विद्युत पुरवठा सुरू असताना चढून तारेला पकडून आत्महत्येचा प्रयत्न केला. विजेच्या तारेचा स्पर्श होताच मोठा आवाज होऊन जाळ झाला व विजय थोरात पोलावरून खाली पडताना रस्त्याने जाणार्‍या काही शेतकर्‍यांनी पाहिला. शेतकर्‍यांनी पळत जाऊन गंभीर जखमी अवस्थेत त्याला उचलून राहाता ग्रामीण रुग्णालयात हलविले.

घटनास्थळापासून जवळच रस्त्यावर त्याने मोटारसायकल उभी करून ठेवली होती. त्याच्या पिशवीत फाईल सापडली व पत्नी व सासरा यांच्या त्रासामुळे मी आत्महत्या करत आहे. पत्नी नेहमी बापाकडे माहेरी जात असे. माझ्याशी नेहमी भांडण करत मला नेहमी मारहाण केली जात होती. त्यांनी मला बर्‍याच वेळा मारण्याचा प्रयत्न केला. पण मी पळून जात असे, त्यामुळेच माझ्या डोक्यात वाईट विचार आला असल्याचे त्याने दोन पानी चिठ्ठी लिहून ठेवली होती.

 त्या कागदपत्रावरून त्याच्या नातेवाईकांशी व गंगापूर पोलिसांशी राहात्याचे पोलीस निरीक्षक परदेशी यांनी संपर्क केला असता त्याने पत्नीचा खून करून तो पसार असून आम्ही त्याचाच शोध घेत असल्याचे गंगापूरचे पोलीस उपनिरीक्षक रवी सानप यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.