भाजप व शिवसेना यांच्यात युती होण्याची आशा धूसर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप व शिवसेना यांच्यात युती होण्याची आशा धूसर झाली आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपमधील इच्छुकांनी पॅनेल बांधणीसह स्वतंत्रपणे प्रचाराला गती दिली आहे. प्रदेशपातळीवरून अजूनही युतीबाबत ठोस निर्णय देण्यात आला नसल्याने युती होणार की नाही याबाबत काही अंशी संभ्रमाचे वातावरण आहे.

Loading...
सेना-भाजप युतीची आशा का झाली धूसर ?
महापालिकेत भाजप व शिवसेना सत्तेत असतानाही दोन्ही पक्षांत धुसफूस सुरूच आहे. मनपा निवडणुकीत शिवसेना व भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा दिला. दरम्यान, युती होईल किंवा नाही याबाबत संभ्रम कायम असतानाच आता निवडणुकीचेही बिगुल वाजले. सर्व प्रभागांत या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे प्रचारालाही सुरुवात केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.