मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम लंपास


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र अकलापूर येथील एकमुखी दत्त मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरांनी लांबवली. हा प्रकार ६ नोव्हेंबरला भरदुपारी दोनच्या सुमारास घडला. चोरटे मंदिरातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाले असून घारगाव पोलिस त्यांचाच शोध घेत आहेत. 


Loading...
मंदिर परिसरात दुपारी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी आत प्रवेश केला. लोखंडी दानपेटी उचकटून ५ हजार ५०० रुपयांची रोकड त्यांनी लांबवली. संध्याकाळी स्थानिक नागरिकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घारगाव पोलिसांना माहिती दिली.

पोलिस निरीक्षक अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मंदिरामध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यानुसार चोरट्यांचा तपास सुरू आहे. देवस्थानचे कर्मचारी रामदास गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


यापूर्वी मार्च २०१७ मध्ये सोन्याचा मुलामा असलेला कळस कापून चोरट्यांनी पोबारा केला होता. त्या घटनेचा तपास अद्याप लागलेला नाही. दानपेटी फोडणाऱ्या चोरट्यांचा तपास जलदगतीने लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.