मनपा निवडणूक : कॉंग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी होणार पण ...


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मनपा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची आघाडी होणार आहे, पण जागावाटप कसे असावे याबाबत अजून एकमत झालेले नाही. १३ ते २० नोव्हेंबर या कालावधीत अर्ज दाखल होणार आहेत. त्यामुळे आघाडीच्या जागावाटप प्रक्रियेला गती येणार आहे. १४ नोव्हेंबरला मुंबईत दोन्ही काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी जागावाटपाच्या मुद्द्यावर एकत्र बसणार आहेत.
Loading...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी या बैठकीचे आयोजन केले आहे. इच्छुकांनी अर्ज दाखल करावे, असेही पक्षाचे निरीक्षक श्यामराव उमाळकर यांनी सांगितले अाहे. आघाडीचा विषय मार्गी लागल्यात जमा असला, तरी जागावाटपाचे सोपस्कर बाकी आहेत.

महापालिकेच्या शहरातील १७ प्रभागांत ६८ नगरसेवक निवडून देण्यासाठी ९ डिसेंबरला नगरकर कौल देणार आहेत. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एमआयएम, आम आदमी पक्ष, कम्युनिस्ट आदी पक्ष आपले उमेदवार रिंगणात उतरवणार आहेत. प्रभाग मोठे झाल्याने इच्छुकांचीही संख्या कमालीची वाढली आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाची सुरू असलेली स्पर्धा चुरस वाढवत आहे. काही नवोदित इच्छुकांनी दोन्ही थडीवर हात ठेवत मिळेल त्या पक्षाचे लेबल लावून रिंगणात उतरण्याचा चंग बांधला आहे. उमेदवारी डावलली, तर प्रसंगी अपक्ष लढणाऱ्यांचीही संख्या वाढणार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.