वीटभट्टी कामगारांकडून मालकालाच बेदम मारहाण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- वीटभट्टीवर काम करण्यासाठी १ लाख ८० हजार रूपये उचल घेणाऱ्या कामगारांनी कामावर जाण्यास नकार देऊन उलट मालकालाच बेदम मारहाण करून जखमी केले. बुधवारी दुपारी १२ वाजता मुळानगर येथे ही घटना घडली. याप्रकरणी वीटभट्टी मालक शिवाजी चौर (लिंपणगाव, ता. श्रीगोंदे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ७ जणांविरूध मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Loading...
चौर यांचा लिंपणगाव येथे वीटभट्टीचा व्यवसाय आहे. या भट्टीवर काम करण्यासाठी मुळानगर येथील चौघा कामगारांनी १ लाख ८० हजार रूपयांची उचल घेतली होती. मात्र, हे कामगार कामावर गेलेच नाहीत. बुधवारी सकाळी वीटभट्टी मालक चौर यांनी मुळानगर येथे जाऊन संबंधित कामगारांना कामावर येण्यास सांगितले.पण त्यांना नकार मिळाला. 

तुम्ही कामावर येण्यासाठी मोठी उचल घेतली आहे, असे सांगताच सातजणांनी चौर यांना बेदम मारहाण करून त्यांच्या वाहनाचे नुकसान केले. चौर यांनी राहुरी पोलिस ठाण्यात येऊन फिर्याद दिल्याने ७ जणांविरूध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस नाईक मोकाटे करत आहेत. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.