ऐन दिवाळीच्या दिवशी नगर जिल्ह्यातील तिघांचा मृत्यू.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दिवाळीनिमित्त संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील घरी निघालेल्या तरुणाचा त्याच्या मित्रांसमवेत मृत्यू झाला आहे. वाई सुरूर रस्त्यावर मंगळवारी रात्री हा अपघात झाला. प्रसाद प्रकाश सोनवणे (वय २६), सुयोग विठ्ठल वाडकर (वय २०) व सायली कळबे (वय २१) असे ठार झालेल्यांची नावे आहेत.

Loading...
ऐन दिवाळीच्या दिवशी प्रसाद सोनवणे यांच्या निधनाची बातमी कळाल्याने आश्वी खुर्द गावावर शोककळा पसरली आहे.प्रसाद हा चिपळुन येथे गारडे केमिकल कंपनीत सेफ्टी इंजिनिअर म्हणून कार्यरत होता. तो मित्रासमवेत चिपळुनवरुन दिपावलीसाठी घरी निघाला होता. 

प्रवासादरम्यान त्यांनी एक व्हीडीओ व फोटो सोशल मिडीयावर टाकला होता. मंगळवारी रात्री १०.३० वाजता घटणा पोलिसांकडून कुटुंबियांना या अपघाताची माहिती मिळाली.प्रसाद हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. 

त्याचे वडील प्रवरा बँकच्या शिर्डी शाखेत मॅनेजर म्हणून तर आई शोभना सोनवणे या सामाजिक कार्यात कार्यरत आहेत. त्याच्या पश्चात दोन विवाहित बहिणी, आजोबा, आजी, चुलते असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात प्रवरातिरी प्रसाद सोनवणे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.