विरोधीपक्षनेत्यांच्या मतदारसंघात रोडरोमिओंचा त्रास, शाळा - महाविद्यालयांमध्ये भीतीचे वातावरण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्याचे विरोधेपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याच मतदारसंघात शाळा, महाविद्यालय परिसरात मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे.शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओंचा उच्छाद वाढला आहे. 
Loading...

शाळा भरताना व शाळा सुटताना शाळा व महाविद्यालय परिसरात रोडरोमिओ दुचाकीचा कर्णकर्कश हॉर्न वाजवत घिरट्या घालतात. या रोडरोमिओंना परिसरातील नागरिकांनी हटकल्यास परिसरातील नागरिकांना दमदाटी होते. 

राहाता पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याने रोडरोमिओ व टवाळखोरांची हिंम्मत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. परिणामी अनेक विद्यार्थिनी भीती व दहशतीच्या सावटाखाली शिक्षण घेत आहेत. पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. 

रोडरोमिओंना आळा घालणे शिक्षकांच्या अथवा शाळा व्यवस्थापनाच्या हाताबाहेर गेलेले असून पोलिसांनी कारवाई केल्याशिवाय त्याला आळा बसणार नाही. मात्र पोलिसांकडून कारवाई होत नाही. एखादा अनुचित प्रकार घडल्यावर राहाता पोलीस जागे होतील का? असा सवाल विचारला जात आहे.

सकाळी राहाता बसस्थानक परिसरात तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शारदा शैक्षणिक संकुलापयंर्त विद्यार्थिनींची मोठी वर्दळ असते. यावेळी नगर-मनमाड राज्य महामार्गावर तसेच बसस्थानक, युनियन बँकेसमोरील परिसरात उनाड टवाळखोर व रोडरोमिओंची मोठी गर्दी असते. 

काही टवाळखोर मुलींच्या पालकांना सुध्दा अप्रत्यक्ष त्रास होईल अशी वर्तणूक करतात व पालक समजावून सांगण्यास अथवा विचारणा करण्यास गेले असता भांडणे वाढविण्याची भाषा करतात.

काही मुलींची अवस्था बिकट होते घरी सांगावे तर शाळा कॉलेज बंद व नाही सांगावे तर उनााडाचा त्रास होतो, त्यामुळे अनेक मुली तेरी अन्याय व त्रास सहन करीत असल्याची चर्चा दबक्या आवाजात शैक्षणिक व विद्यार्थ्यांचे वतुर्ळात सुरू आहे. 

अनेक पालकांना यांचा बंदोबस्त व्हावा असे वाटते. परंतु, नसती झंझट, भांडण व टुकाराची गाठ म्हणून काही पालक स्वत:च मुलींना आणून सोडतात व घेऊन जातात. मात्र, याने फक्त आपल्या मुलीचा प्रश्न सुटतो इतर मुलींच्या त्रासाचे काय?
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.