पाण्याच्या वादातून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतातील बोअरच्या पाण्याच्या वादातून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. नगर तालुक्यातील पारगाव मौला येथे ही घटना ४ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. मारहाण झालेल्या सागर संजय बोडखे यांच्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला. 


Loading...
त्रिंबक साहेबराव बोडखे, नीलेश त्रिंबक बोडखे व चंद्रकला त्रिंबक बोडखे अशी आरोपींची नावे आहेत. शेतातील सामायिक पाण्याचा बोअर आमच्या वाटणीच्या हद्दीत आहे, त्यात तुमचा काहीच संबंध नाही, असे म्हणत आरोपींनी संजयला शिवीगाळ व दमदाटी केली. लाथाबुक्क्यांनी मारहाण करत लाकडी दांडक्याने डोक्यात मारत संजयला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.