झावरे समर्थक नाराज,पारनेरची राजकीय समीकरणे बदलणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक तालुकाध्यक्षपदी कडूस येथील विक्रम कळमकर यांची निवड झाली. त्यांना जिल्हाध्यक्ष कपिल पवार यांनी नियुक्तीचे पत्र दिले. अशोक घुले यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती केल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिले.


Loading...
पारनेर राष्ट्रवादीमध्ये अनेक महिन्यांपासून धुसफूस सुरू आहे. बाजार समिती निवडणुकीत सुजीत झावरे यांनी आपल्याच पक्षाच्या सभापतीवर शिवसेनेच्या मदतीने अविश्वास ठराव आणला. त्यानंतर झावरेंंच्या विरोधात दादा कळमकर, माजी जि. प. सदस्य मधुकर उचाळे, सभापती प्रशांत गायकवाड, अशोक सावंत, दीपक पवार यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. 

गायकवाड यांनी अविश्वास ठराव परतवून लावत झावरेंना पहिला शह दिला. आता राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्षपद दुसऱ्या गटाच्या ताब्यात आल्यामुळे यापुढील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. झावरे समर्थक नाराज झाले असून ते काय भूमिका घेतात हे महत्त्वाचे आहे.


झावरे यांनी भाळवणी येथील बबलू रोहकले यांची युवक तालुकाध्यक्षपदी निवड केली होती, परंतु पक्षाने निवड रद्द करुन युवकच्या तालुकाध्यक्षपदी गायकवाड व उचाळे गटाचे विक्रम कळमकर यांची निवड केली. 


मधुकर उचाळे-प्रशांत गायकवाड यांच्या दुसऱ्या गटाला वळसे यांची राजकीय ताकद दिली. बाजार समितीत झालेल्या घडामोडीत झावरे यांना वळसे गटाने मात दिली होती. पक्षशिस्त मोडली म्हणून झावरे यांना कारणे दाखवा नोटीस पक्षाने दिली, पण त्यांनी नोटिशीला उत्तर दिले नव्हते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.