नगर-औरंगाबाद महामार्गावर अपघातात दोन जण जागीच ठार


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बुधवारी सकाळी साडेसहा वाजता नगर-औरंगाबाद महामार्गावर दत्त दिगंबर हॉटेलसमोर कार आणि मोटारसायकलीच्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. 
Loading...

कमलाकर सखाराम गाडेकर (६२ वर्षे, एमआयडीसी बजाजनगर, वाळूंज) व पांडुरंग दत्तुजी कडू (मेहेकर, जिल्हा बुलढाणा) हे औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात होते. त्यांची मोटारसायकल (एम एच २० ईक्यू ६५५६) दत्त दिगंबर हॉटेलसमोर जात असताना पाठीमागून आलेल्या एम एच २० बी वाय ७०१७ या कारची त्यांना जोरात धडक बसली. 

अपघातानंतर कारचालक जखमींना मदत न करता फरार झाला. स्थानिक नागरिकांनी दोन्ही जखमींना ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अमोल वसंत होले हे प्रवरासंगम येथे दिवाळीच्या खरेदीसाठी जात होते. गर्दी पाहून अपघाताच्या ठिकाणी तो गेले असता मृत कमलाकर गाडेकर हे त्यांच्या ओळखीचे निघाले. 

त्यांनी मित्र सचिन कमलाकर गाडेकर यांना फोन करून या अपघाताबद्दल कळवले. होले यांनीच पोलिसात फिर्याद दिली. या अपघातात मोटारसायकल व कारचेही नुकसान झाले. पोलिसांनी फरार कारचालकास सायंकाळपर्यंत अटक केलेली नव्हती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.