मारहाण प्रकरणी माजी आमदार घुले बंधुंविरोधात गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- माजी आमदार चंद्रशेखर घुले व माजी आमदार नरेंद्र घुले यांच्यासह सहा जणांविरुद्ध मारहाण केल्याची फिर्याद ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे सभासद ज्ञानेश्वर पाडळे यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिली असून त्यावरून काल रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Loading...

फिर्यादीत म्हटले की, 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता ज्ञानेश्वर कारखान्याच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये ज्ञानेश्वर कारखान्याचे नाव बदलण्याचा महत्त्वाचा विषय होता. याला फिर्यादी सभासद ज्ञानेश्वर कारभारी पाडळे (वय 65) रा. देवगाव ता. नेवासा यांनी विरोध केला.


त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष नरेंद्र घुले यांच्यासह विलास दत्तात्रय लोखंडे, विठ्ठल परदेशी, छबुभाई इमान शेख, बशीर उर्फ बंडूभाई चांदुभाई शेख व इतर पाचसहा जणांनी शिवीगाळ करून चेंबरमध्ये कोंडून मारहाण केली. या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.