आ.मोनिका राजळे यांना शेतकऱ्यांविषयी पुतना माावशीसारखा कळवळा !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्यात तीन जिल्ह्यात नाही, असा शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मोठा कारखाना उभा राहतोय, ही शेवगाव तालुक्याच्या दृष्टीने नव्हे तर, जिल्ह्याच्या दृष्टीने एक अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतू शेवगाव-पाथर्डी तालुक्याच्या आमदार मोनिका राजळे यांना शेतकऱ्यांसाठी असलेल्या कारखान्याविषयी असलेली उदासीनता दिसून येते. 
Loading...

राजळे यांना शेतकऱ्यांविषयी पुतना माावशीसारखा कळवळा असल्याचे दिसून येते, अशी टीका जि.प. सदस्या हर्षदाताई काकडे यांनी केली. त्यापुढे म्हणाल्या,आ. राजळे व त्यांच्या समर्थकांना काही माहिती नसताना फक्त समोरच्याला विरोध करणे, एवढाच त्यांचा उद्योग आहे. 

तालुक्याच्या पूर्वभागातील तीन पिढ्यांपासून वंचित राहिलेल्या ताजनपूर लिफ्टचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी दोन ते अडीच हजार महिलांसह औरंगाबाद येथे गोदावरी कृष्णाखोरे महामंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता श्री. झपके यांच्याकडून ४५० कोटींची ताजानापूर लिफ्ट योजना मंजूर करुन घेतली. परंतू त्या योजनेतून चार वर्षांत पाण्याचा एक थेंबही आ. राजळेंना या गावांना देता आला नाही. 

सौ. काकडे या पाणी देणाऱ्या आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्याधर काकडे यांना तिकीट मिळाले नाही, तरी काकडे दाम्पत्याने त्यांना मोठ्या मनाने विधानसभेत पाठवले. याची त्यांनी जाणीव ठेवली नाही. २०१९ च्या निवडणुकीत जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.