संगमनेरात अज्ञाताने दोन मोटारसायकली जाळल्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  संगमनेर शहरालगतच असणाऱ्या साईश्रद्धा चौक येथील प्रभाकर आप्पाजी शिंदे यांच्या मालकीच्या असणाऱ्या दोन मोटारसायकली अज्ञात इसमाने जाळल्याची घटना मंगळवार दि.६ नोव्हेंबर रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे या मोटारसायकली नेमकी कोणी जाळल्या आहेत,असा प्रश्नही आता निर्माण झाला आहे. 
Loading...

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरालगतच काही अंतरावर साईश्रद्धा चौक असून याठिकाणी प्रभाकर शिंदे हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. 

नेहमीप्रमाणे त्यांनी आपल्या मोटारसायकल क्रमांक एमएच १७ बीई २८३९ व मोटारसायकल क्रमांक एमएच १७ ए ८९७४ या दोन्ही मोटारसायकली घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत लावल्या होत्या.मंगळवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास कोणीतरी अज्ञात इसमाने या दोन्ही मोटारसायकली पेटवून दिल्या. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.