ना.राधाकृष्ण विखेंच्या कार्यक्रमानंतर पंचायत समिती सभापतींच्या पतीस गंभीर मारहाण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  ना.राधाकृष्ण विखे यांच्या विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर व्यासपीठाजवळून जवळून जाणाऱ्या पाकिटमारांना हटकल्याने त्याचा राग मनात धरून राहाता पंचायत समितीचे सभापती हिराबाई कातोरे यांचे पती भाऊसाहेब रंगनाथ कातोरे यांना पाकिटमारांनी जबर मारहाण करुन जखमी करण्यात आल्याची घटना काल घडली.
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी कि काल निमगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन ना.राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते पार पडले.ना.विखे हे व्यासपीठावरून गेल्यानंतर तेथून आपल्या दुचाकीवर जाणारे कुणाल विलास जगताप,अजय वैजनाथ भांगे,सचिन भाऊसाहेब नागरे हे तरुण जात असताना 'तुम्ही येथून व्यवस्थित जा' असे भाऊसाहेब कातोरे यांनी सांगितले. 

त्यांनी कातोरे यांना अर्वाच्य भाषेत बोलण्यास सुरवात केली. तेथे जमलेल्या ग्रामस्थांनी यावेळी त्या तरुणांना तेथून काढून दिले. त्यानंतर कातोरे हे आपल्या घराकडे जात असताना हॉटेल सनराज जवळ त्या टारगट तरुणांनी त्यांना शिवीगाळ केली व सनराज जवळून हौसिंगकडे जाणाऱ्या रस्त्याने त्या तरुणांनी आपल्या दुचाकीवर पळ काढला. 

त्यांचा पाठलाग कातोरे यांनी केला असता सोनुबाबा तळ्याजवळ कातोरे यांच्या मोटारसायकलला कट मारून त्यांना चरात ढकलले. तसेच हातातील फायटरच्या सहाय्याने तोंडावर व छातीवर गंभीर मारहाण करून जखमी केले. या वरून शरद काशिनाथ मते (रा.निघोज) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की मी वरील तीन आरोपींना चांगले ओळखत असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. ते कायम या परिसरात पाकिटमारी व दहशत निर्माण करतात. 

काल साडेदहाच्या सुमारास भाऊसाहेब कातोरे,धनंजय पाटील,वाल्मिक गाडेकर,प्रदीप खरात,उत्तम खरात यांच्या समोर आरोपी अजय भांगे,कुणाल जगताप,सचिन नागरे यांनी 'तू आमच्या नादी लागू नको तुझा गेम करतो' असे म्हणून दुखपतीस कारणीभूत ठरले या वरून शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.