साई संस्थानच्या अध्यक्षांना साईबाबा माफ करणार नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिर्डी विमानतळ असो, रेल्वे स्टेशन असो वा ग्रामीण भागातील विकासाची कामे, ती सोडवण्यासाठी आपण नेहमीच राजकीय सत्तेचा वापर विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी केला. या भागातील तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी प्रयत्न केला आहे. 
Loading...

साईबाबांच्या झोळीत हात घालून राज्यभर मोठ्या प्रमाणावर निधीवाटप करणाऱ्या साई संस्थानच्या अध्यक्षांना साईबाबा माफ करणार नाही. आम्ही कधी साईंच्या झोळीत हात घातला नाही. या भागात निधीची आवश्यकता असताना साईबाबा संस्थान बाहेर निधी वाटत आहे, हे गैर असल्याचे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शिर्डीलगत असलेल्या निमगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ना. विखे पाटील यांच्या हस्ते १ कोटी ६५ लाख रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे लोकार्पण पार पडले. या वेळी ते बोलत होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.