सकाळी सातपासून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी ओपीडी सुरू : आ. कर्डिले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  वर्षभरावर लोकसभा व विधानसभाच्या निवडणुका आल्याने विरोधकांच्या वावटळी मतदारसंघात सुरू झाल्या असून, मतदारसंघातील जनतेच्या प्रश्नांचे राजकीय भांडवल करून स्वत:ची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे प्रतिपादन आ. शिवाजी कर्डिले यांनी केले. 
Loading...

पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी येथे एक कोटी चौदा लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आ. मोनिक राजळे होत्या.

आ. कर्डिले पुढे म्हणाले, गेली पंचवीस वर्षे मी सालकरू म्हणून जनतेची सेवा करतोय, सकाळी सातपासून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझी ओपीडी सुरू असते. 

मी जनतेच्या सुख दु:खात सहभागी होतोय, विकासकामे करतोय म्हणून फोटोत दिसतो, ज्यांना कामच करायचे नाही, असे लोक फोटोत दिसतीलच कसे, असा टोला तनपुरे यांना लगावला.कोणी कितीही बैठका, मेळावे घेऊ द्या, आ. मोनिका राजळेंना कोणी रोखू शकत नाही. 

आ राजळे म्हणाल्या, सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. आंदोलने व मोर्चे काढून पाणीप्रश्न सुटत नसतात, त्या कामाचा पाठपुरावा करणे महत्वाचे असते. केंद्रातील व राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू माणून विकासाच्या विविध योज़ना राबवल्या आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.