डॉ. सुजय विखेंच्या फराळ वाटपाची जिल्हाभरात चर्चा.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  युवक काँग्रेसचे नेते डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामधील प्रत्येक गावांत दिवाळी भेट म्हणून फराळाचे वाटप सुरू केल्याने डॉ. विखे लोकसभेची निवडणूक हमखास लढवणारच, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे. 
Loading...

डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून भेटकार्ड आणि त्यासोबत फराळाचा बॉक्स, प्रत्येक गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रापं. सदस्य, सेवा संस्थेचे चेअरमन, व्हाचेअरमन, संचालक, नगरसेवक, पंचायत समिती सदस्य , पत्रकार, अशा सर्व पदाधिकाऱ्यांना घरपोहच करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या विखेंच्याच फराळाची चर्चा चांगलीच रंगली आहे. 

डॉ. विखे यांच्या टीमने प्रत्येक गावचा, तालुक्याचा व त्या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांचा बायोडाटाच तयार केला आहे. या अगोदर प्रत्येक तालुक्यात मोफत आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून सर्वसामान्य गरीब गरजू लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न डॉ. विखे यांनी केला. 

त्यानंतर आता दिवाळी शुभेच्छाच्या माध्यमातून प्रत्येक गावच्या पदाधिकाऱ्यापर्यंत पोहचण्याचे काम विखे यांच्या टीमकडून केले जात आहे. यापूर्वी कोणत्याही पुढाऱ्याने असा फराळ वाटपाचा उपक्रम दक्षिण लोकसभा मतदारसंघात राबवलेला नाही; परंतू निवडणूक लढवण्यापूर्वीच विखेंनी राबवलेला हा फंडा चर्चेचा विषय ठरला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.