आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीलाच पक्षातूनच विरोध !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- स्व. गोपीनाथ मुंडे यांनी पाथर्डी तालुक्‍यावर कायमच प्रेम केले. त्यांनी पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात ओबीसी उमेदवाराला उमेदवारी देऊन या घटकाला न्याय दिला आहे. ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनीही आगामी निवडणुकीत ओबीसी उमेदवाराला उमेदवारी द्यावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांनी केले आहे. या मागणीमुळे अप्रत्यक्षरित्या आमदार राजळे यांच्या उमेदवारीलाच पक्षातातून विरोध होत असल्याचा संदेश यानिमित्त जात असल्याचे दिसते.

Loading...
भाजपा भटक्‍या विमुक्त आघाडीच्या प्रदेश संघटनमंत्रिपदी निवड झाल्याबद्दल राहुल कारखेले, माहेश्वरी समाजाच्या तालुकाध्यक्षपदी डॉ. विलास बाहेती यांची, तर भाजपा उद्योग आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नितीन एडके यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, तालुका वैद्यकीय आघाडी व विविध संघटांनाच्या वतीने आयोजित गौरव समारंभात गर्जे बोलत होते.

अशोक चोरमले, राजे शिवछत्रपती संस्थेचे अध्यक्ष गहिनीनाथ ढाकणे, ऍड. दिनकर पालवे, डॉ. रमेश टकले, संतोष दहिफळे, उद्योजक बाबासाहेब ढाकणे, राहुल कारखेले, अशोक मंत्री, नवनाथ आव्हाड, ऍड. सतीश पालवे, भगवान बांगर, माणिक दराडे, डॉ. ज्ञानेश्वर दराडे, अनिल फुंदे, डॉ. विलास बाहेती, डॉ. सचिन गांधी, डॉ. सुहास उरणकर, राहुल दरंदले, नवनाथ वाघ, नबाब शेख, डॉ. सुहास उरणकर, डॉ. जगदीश मुने आदी उपस्थित होते.

यावेळी बहुतेक वक्‍त्यांनी भाजपाची विधानसभेची उमेदवारी ओबीसी घटकाला मिळावी, असा सूर लावला. आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष विरोधक केला आहे. त्यामुळे भाजपातील बंडखोरी अटळ असल्याचे मत कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले आहे. यावेळी बोलताना अशोक गर्जे म्हणाले, पाथर्डी-शेवगाव मतदारसंघात ओबीसी मतदारांची संख्या मोठी आहे.

भारतीय जनता पक्षाने येथे ओबीसी घटकाला प्राधान्य देत उमेदवारी द्यावी. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम करणारा हा तालुका आहे. मुंडे यांनी या भागात शब्द टाकावा आणि तो आम्ही प्रमाण मानावा, अशी आजपर्यंतची अवस्था आहे. आजही ना. मुंडे या भागावर तेवढेच प्रेम करतात.

स्वर्गीय मुंडे यांनी प्रताप ढाकणे यांना दोन वेळा, स्वर्गीय दगडू पाटील बडे यांना एकदा उमेदवारी दिली होती. बडे आमदारही झाले होते. ओबीसी समाजाला एक आमदारकीची जागा द्यावी, अशी आमची मागणी आहे. यावेळी ना. मुंडे यांनी ओबीसी समाजाला उमेदवारी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. प्रास्ताविक डॉ. श्रीधर देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन बाळासाहेब ढाकणे यांनी केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.