निवडणुकीत कोण-कोणाच्या नौकेत स्वार होत आपली नौका पार करणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शहरात दिवाळी निमित्त दाखल झालेल्या सावेडी, तांबटकर मळा येथील किड्स वे फन सिटी या मनोरंजन नगरीचे उद्घाटन अली पब्लिक स्कुलचे अध्यक्ष मौलाना अन्वर खान नदवी यांच्या हस्ते झाले. या मनोरंजन नगरीच्या उद्घाटनासाठी आलेल्या शहरातील विविध पक्षाचे राजकारणींनी एकत्रित झोक्यात बसून खेळाचा आनंद लुटला. 

Loading...

मनपा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राजकीय वातावरण तापले असताना पक्षांतराचा फड रंगला आहे. कोण-कोणाच्या नौकेत स्वार होत आपली नौका पार करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा खेळ मात्र कुरघोड्यांचा असणार असून, कुरघोडीच्या राजकारणात ही निवडणुक रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. एका नौकेत एकत्र आलेल्या या राजकारण्यांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. 

यावेळी मनपा विरोधी पक्ष नेते बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, नगरसेवक समद खान, फैय्याज शेख, मुदस्सर शेख, सचिन जाधव आदींसह आयोजक अंजर अन्वर खान, माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, डॉ.इम्रान, वाहिद हुंडेकरी, डॉ रिजवान शेख, इरफान जहागीरदार, नफीस चुडीवाला, अकबर बॉम्बेवाला, राजू जहागीरदार, शफी जहागीरदार, खालिद शेख, नवेद आरटीओ, शोएब जहागीरदार, नईम सरदार, कासम केबलवाले, मौलाना आदम, वसीम शेख, अजीम राजे, मोहसिन सय्यद, इब्राहिम पठाण, मोहम्मद अली खान, मतीन शेख, जैद शेख आदी उपस्थित होते.

मौलाना अन्वर नदवी म्हणाले की, स्पर्धामय युगात मानसिक शांततेची गरज आहे. कुटुंबासह वेळ व्यतीत केल्यास मानसिक समाधान मिळते. धावत्या युगात मनुष्याला कुटुंबाला वेळ देता येत नाही. कुटुंबाच्या विरंगुळ्यासाठी ही आनंदनगरी दिवाळीत पर्वणी ठरणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. बाळासाहेब बोराटे यांनी दिवाळीमध्ये नगरकरांना या आनंदनगरीचा लाभ घेता येणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागुल यांनी केले. आभार राजू जहागीरदार यांनी केले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.