कृषी विद्यापिठ मधील कर्मचार्‍यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी कास्ट्राईबचा पुढाकार


कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची नाशिक विभागीय बैठक संघटनेच्या नगर कार्यालयात राज्याध्यक्ष एन.एम. पवळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकित कर्मचार्‍यांचे प्रश्‍न शासनस्तरावर सोडविण्यासाठी डिसेंबर मध्ये संघटनेचे राज्य अधिवेशन औरंगाबादला घेण्याचे जाहीर करण्यात आले. 

यावेळी राज्य उपाध्यक्ष सयाजी खरात, राज्य सहसचिव निवृत्ती आरु, नाशिक विभागीय अध्यक्ष ना.म. साठे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, कृषी विद्यापिठाचे डॉ.सुरेश उबाळे, बाळासाहेब घोडके, गुलाबराव जावळे, सुभाष पोटे, डॉ.एस.के. कांबळे, शशीकांत गायकवाड, डॉ.कैलास कांबळे, लुईस पाळंदे आदींसह कास्ट्राईबचे पदाधिकारी उपस्थित होते.

सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा लाभ शासकीय कर्मचार्‍यांना लागू केलेला असताना महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापिठ मधील कर्मचारी सन 2006 पासून या लाभापासून वंचित आहे. या प्रश्‍नावर आवाज उठवून प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय या बैठकित घेण्यात आला. कृषी विद्यापिठ अंतर्गत असलेल्या 10 जिल्ह्यांमधील मागासवर्गीय शासकीय कर्मचारी संघटना कास्ट्राईबशी संलग्न झाल्याने त्यांचे स्वागत करण्यात आले. 

महाराष्ट्र शासना मधील अनेक विभागातील पन्नास टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असल्यामुळे तात्काळ ही पदे भरण्यासाठी कास्ट्राईबच्या माध्यमातून मुख्यमंत्री व संबंधीत अधिकार्‍यांशी पाठपुरावा करण्याचे जाहिर करण्यात आले. कृषी विद्यापिठाच्या अनेक विभागाची मान्यता रिक्त पदाअभावी मिळालेली नाही. 

यामुळे महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून राखून ठेवलेली 50 टक्के रिक्त पदे भरण्यास मंजुरी देणेसाठी प्रस्ताव पाठविण्याचे ठरविण्यात आले. तर विद्यापिठामध्ये सेवा ज्येष्ठतेनुसार मागासवर्गीय अधिकार्‍यांना पदभार देणे, वंचित घटकांना देखील पदोन्नती मध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पाहुण्यांचे स्वागत ना.म. साठे यांनी केले. आभार के.के. जाधव यांनी मानले.
Powered by Blogger.