आरबीआय ने पेन्शन धारकांना कर्ज न देण्याचा सेंट्रल बॅक ऑफ इंडियाला काढला फतवा.


आरबीआय ने देशातील सेंट्रल बॅक ऑफ इंडियाला पेन्शन धारकांना कर्ज न देण्याचा फतवा काढल्याने या निर्णयाला पेन्शन धारक माजी सैनिकांनी विरोध दर्शविला आहे. 

सेंट्रल बँक मध्ये माजी सैनिकांना कर्ज मिळण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याने तातडीने त्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या मागणीचे निवेदन जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने खा.दिलीप गांधी यांना देण्यात आले. तर या प्रश्‍नी केंद्रसरकारचे लक्ष वेधून हा प्रश्‍न सोडविण्याची मागणी करण्यात आली. खा.गांधी यांनी केंद्र स्तरावर तसेच सेंट्रल बॅक ऑफ इंडिया व आरबीयाशी पत्रव्यवहार करण्याचे आश्‍वासन दिले.

सिमेवर रक्षणाचे कर्तव्य बजावून सेवानिवृत्त झालेल्या माजी सैनिकांना पेन्शन चालू असते. लाखो माजी सैनिक सेंट्रल बॅक ऑफ इंडियाचे खाते धारक आहेत. या बँकेच्या माध्यमातून माजी सैनिक आपली आर्थिक गरज भागविण्यासाठी कर्ज घेत असतात. त्यांनी घेतलेले कर्जाचे हप्ते या पेन्शन मधून जात असते. सर्व माजी सैनिकांनी आपले बँक खाते सेंट्रल बॅक ऑफ इंडिया मधून इतरत्र वळविल्यास बँकेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. 

यासाठी केंद्रसरकारने या प्रश्‍नी लक्ष घालून आरबीआय व बँकेशी चर्चा करुन प्रश्‍न सोडविण्याची मागणी जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, निवृत्ती भाबड, भाऊसाहेब कर्पे, नारायण पालवे, गणेश पालवे, बन्सी दारकुंडे, कुशल घुले, भाऊसाहेब देशमाने, संजय पाटेकर, संभाजी वांढेकर, दिगंबर शेळके, संतोष मगर आदी उपस्थित होते.
Powered by Blogger.