आयकॉन पब्लिक स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन व पालक मेळावा संपन्न


देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आजच्या आधुनिक युगात नव्या संशोधकांची व शास्त्रज्ञांची गरज असून आपले विध्यार्थी उत्तम घडावेत या हेतूने आयकॉन पब्लिक स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन व पालक मेळावा घेण्यात आला. यावेळी ई. १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध उपकरणाच्या प्रदर्शनाची पाहणी प्राचार्य सौ.आराधना राणा व पालकांनी केली.
पाण्याच्या प्रेशरचा वापर करून तयार केलेली लिफ्ट,जेसीबी.तसेच पर्यावरण जागृती त्याचे परिणाम , सोलर एनर्जीचे फायदे अशा विविध उपकरणांन बरोबर दळणवळण साधने,धार्मिक स्थळे व त्याचे महत्व या विषयी मुलांनी अतिशय सुंदर सादरीकरण करून माहिती दिली.

यावेळी पालकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य सौ. आराधना राणा म्हणाल्या की, मुलांना परिपूर्ण बनविण्यासाठी पालकांचा सहभाग आवश्यक असून मुलांची आवड निवडी ,बरोबरच त्यांचा मित्र परिवार,त्यांच्यात होणारे बदल या विषयी पालकांनी सतत जागृत असणे गरजेचे आहे. शिक्षक जबाबदारीने शिकवितातच त्याचप्रमाणे मुले होमवर्क करतात का याकडे लक्ष दिले पाहिजे. पालकांनी शिक्षकांशी सतत संपर्क ठेवून आपल्या पाल्याच्या प्रगती विषयी जाणून घेण्यासाठी पालक मेळाव्यात उपस्थित राहून सूचना केल्या तरच आवश्यक ते बदल करता येतील असे मत व्यक्त केले.

शासनाच्या वतीने रुबेला लसीकरण मोहीम सुरु असून या विषयी पालकांना माहिती देवून पत्रके देण्यात आली.उपस्थित पालकांनी प्राचार्या व शिक्षकांशी संवाद साधला.तसेच विज्ञान प्रदर्शनास भेट देऊन मुलांनी केलेल्या उपकरणांचे कौतुक केले.

शरद मुथा एज्युकेशन ट्रस्टचे मुख्य संस्थापक शरद मुथा,चेअरमन अशोक मुथा,विश्वस्त निर्मल मुथा,अमित मुथा,संचालक आर.सी. राणा यांनी प्रदर्शनात सहभागी गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करण्याऱ्या शिक्षकांचे तसेच उपस्थित जागृत पालकांचे अभिनंदन केले .
Powered by Blogger.