दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख येथील नंदू चिमाजी वर्पे (वय 35) यांचा घोटी-सिन्नर रस्त्यावर शेणीत फाटा येथे दुचाकीला अपघात झाल्याने मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि.3) सकाळी अकराच्या सुमारास झाला.


Loading...
कोपरगाव तालुक्‍यातील रांजणगाव देशमुख येथील नंदू चिमाजी वर्पे हे संगमनेर येथील मालपाणी उद्योगसमूहात नोकरीस होते. ते शनिवारी कामानिमित्त इगतपुरीकडे जात होते. दरम्यान घोटी-सिन्नर रस्त्यावर शेणीत फाटा येथे त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. अपघातात वर्पे यांच्या डोक्‍यास व पायाला जोराचा मार लागला.

त्यांना उपचारासाठी धामणगाव येथील एसएमबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्‍टरांनी वर्पे यांना मृत घोषित केले. नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रात्री 8 वाजता रांजणगाव देशमुख येथे वर्पे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्‍चात आई वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.