आमदार कर्डिलेंंचे फोटोसेशन श्रेय लाटण्यासाठी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहुरी शहर राष्ट्रीय पेयजल ही वर्षानुवर्षे कामे सुरू असलेली योजना असताना पाणी पुरवठा मंत्र्यांबरोबर फोटो सेशन करून आपणच पाठपुरावा केल्याचे दाखवण्याची आमदार शिवाजी कर्डिले यांची भूमिका दुसऱ्याचे श्रेय लाटणारी आहे, अशी टीका नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत केली. 


Loading...
तनपुरे म्हणाले, आरडगाव ग्रामपंचायतीने या कामासाठी पूर्वीच प्रस्ताव दिले असून १४ व्या वित्त आयोगातून काही कामे झाली आहेत. योजनेसाठी केंद्राचा निधी आहे. एस्टिमेट झाल्यानंतर पुढील प्रक्रिया बाकी असतानाच मंत्र्यांबरोबर बुके घेऊन आमदार कर्डिले यांनी फोटोसेशन केले. 

जायकवाडीला मुळा धरणातून पाणी जाऊ नये, यासाठी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे प्रयत्न करण्याची गरज होती. पाणी वाचले असते, तर मुळा उजवा व डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील आवर्तन वाढले असते. मुळा व प्रवरा नदीपात्रात वाळूतस्करांनी धुमाकूळ घातला आहे. 


गावकऱ्यांनी विरोध केल्यास तस्करांकडून धमक्या दिल्या जातात. महसूल व पोलिस प्रशासनाकडून वाळूतस्करीकडे दुर्लक्ष होते.लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक राहिला नसल्याने तस्करीला पाठबळ मिळते, असा आरोप तनपुरे यांनी केला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.