अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेवगाव तालुक्यातील एका गावातील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची घटना घडली. याप्रकरणी नितीन भीवसेन जाधव (वय ३८) याच्याविरुध्द शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 


Loading...
याबाबत मुलीच्या नातेवाईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी नितीन ज़ाधव याने तीन महिन्यांपूर्वी मुलीची छेड काढल्यावरून आमचे वाद झाले होते. दि. १ नोव्हेंबर रोज़ी मुलगी परीक्षेचे पेपर देण्यासाठी शाळेत गेली होती. पेपर सुटल्यानंतर आरोपीने सदर मुलीस आमिष दाखवून किंवा भुरळ घालून पळवून नेले असावे. या फिर्यादीवरून ज़ाधव याच्याविरुध्द शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.