सुरेश हावरे यांना देवस्थान आपल्या मालकीचे असल्याचा गैरसमज !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांना देवस्थान आपल्या मालकीचे असल्याचा गैरसमज झाला आहे. त्यामुळे ते मनमानी कारभार करत आहेत. सत्तेच्या जीवावर ते नाचत असल्याची टीका युवानेते डॉ. सुजय विखे यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
Loading...

साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 50 कोटी निधी, तसेच चांदीची नाणी घोटाळा प्रकरणी जाब विचारण्यास गेलेल्या शिर्डी नागरिकांना सुरक्षाअधिकारी व पोलिसांकडून अडविण्यात आले. 


त्यामुळे संतप्त नागरिकांनी त्यांच्या गाडीची काच फोडली होती. शासकीय कामात अडथळा व जमावबंदी आदेश मोडल्याप्रकरणी या नागरिकांना अटक करण्यात आली. अटक केलेल्या कार्यकर्त्यांची भेट डॉ. विखे यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्य सरकार व भाजप कार्यकर्ते मंदिरे व देवस्थानांमध्ये हस्तक्षेप करत आहेत. या संस्थांवर भाजपच्या विचाराची माणसे बसवून मनमानी कारभार करत आहेत. आज दुष्काळासाठी राज्य सरकारकडे कुठलाही निधी शिल्लक नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात इतर ठिकाणी निधी वळविला जातो. पण दुष्काळात कुठलाही निधी शेतकऱ्यांना मिळत नाही.

साईबाबांच्या पैशावर व्यक्तीशः कोणाचा अधिकार नाही. पण कमीत कमी शिर्डी व पंचक्रोशीचा विकास झाला पाहिजे. प्रत्येक वेळेस शासनाच्या म्हणण्यानुसार साईबाबा संस्थानचा निधी बाहेर दिला जातो. त्यासाठी नागरिकांनी आंदोलन करून विरोध दर्शविला. 


या विरोधामुळे त्यांना दुर्दैवाने अटक करण्यात आली. या नागरिकांना जामीन मिळाल्यानंतर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची पुढील भूमिका ठरवू, असेही डॉ. विखे यांनी सांगितले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.