श्रीगोंद्यातील शेतकऱ्याची सहा लाखांची फसवणूक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  लष्करात मोटार लावून देतो म्हणून श्रीगोंदे येथील शेतकरी यांची 6 लाख रुपयांची मोटारगाडी परस्पर लांबवली आहे. मंगेश विठ्ठल महाडीक (वय 30, रा. उक्कडगाव, ता. श्रीगोंदे) यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलिसांनी राहुल अरुण सिद्धू (रा. वडारवाडी, ता. नगर) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे. 
Loading...

महाडीक व सिद्धू याचा या मोटारगाडी लष्कारात लावून देण्याचा करार स्टेट बॅंक चौकात झाला होता. तशी नोटरी देखील झाली होती. महाडीक यांनी कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर सिद्ध याच्या ताब्यात मोटारगाडी दिली. सिद्धू याने ही मोटारगाडी ताब्यात घेतल्यानंतर ती परत केलेली नाही. वारंवार पाठपुरावा करून देखील मोटारगाडी परत न मिळाल्याने महाडीक यांनी भिंगार कॅम्प पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.