..तर डॉ. सुरेश हावरेना शिर्डीत फिरकू देणार नाही.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे संस्थानच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी करीत आहेत. संस्थानची रुग्णालये ऑक्सिजनवर असताना विदर्भातील सरकारी रुग्णालयांना १५० कोटी दिले. शिर्डी नगरपंचायत विकासकामांना निधी मंजूर करायचा आणि मंत्रालयात फायली प्रलंबित ठेवण्याचे उद्योग हावरे यांनी दोन वर्षें केले. यापूर्वीच्या विश्वस्तांनी शिर्डीत केलेल्या कामांचे श्रेय हावरे घेत आहेत. 
Loading...

दोन वर्षांत त्यांनी एकही विकासकाम केलेले नाही. अामचा निधी बाहेर देऊ नका, या मागणीचे निवेदन द्यायला जाताना आम्हाला गेटवर अडवले, पण भाजपच्या कार्यकर्त्यांना अात साेडल्याने काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. आता आम्ही जगभरातील साईभक्तांना शिर्डीत बोलावून विश्वस्तांच्या कारभाराचा भंडाफोड करणार आहोत. यापुढे हावरेंना शिर्डीत फिरकू देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी व्यक्त केली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.