बाजार समिती संचालिकेच्या पतीविरोधात गुन्हा दाखल.

                 

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी विष्णूपंत खंडागळे यांनी बाजार समितीच्या पाच संचालकांची पदे अपात्र करावीत याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. याचा राग आल्याने एका संचालिकेच्या पतीने खंडागळे यांना फोनवरून धमकी दिली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 
Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी, खंडागळे यांनी बाजार समितीच्या पाच संचालकांविरूद्ध त्यांचे पद अपात्र कसे याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. यात दत्तनगर येथील सुनीता नानासाहेब शिंदे यांचाही सामावेश आहे.

याचा राग आल्याने सुनीता शिंदे यांचे पती सुनील उर्फ नानासाहेब शिंदे यांनी फोनवरून खंडागळे यांच्याशी संपर्क साधून त्यांना तुझ्याकडे पाहून घेतो, अशी धमकी दिली. याप्रकरणी खंडागळे यांनी तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिंदे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.