स्वस्त धान्य दुकानात अपहार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदे तालुक्यातील चांभुर्डी या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानात धान्याचा मोठ्या प्रमाणात अपहार केल्याप्रकरणी तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक पाचारणे यांनी त्याच्या विरोधात बेलवंडी पोलिस ठाण्यात शुक्रवारी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला. 
Loading...

चांभुर्डी या ठिकाणी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चांभुर्डी याच्यामार्फ़त महेश ढगे हे स्वस्त ध्यानाचे दुकान चालवतात. ३१ ऑक्टोबर रोजी तहसीलदार श्रीगोंदे यांना गुप्त बातमीदाराकडून दुकानातील धान्यात अपहार झाल्याची माहिती मिळताच तहसीलदार यांच्या आदेशाने पुरवठा निरीक्षक पाचारणे हे दुकान तपासणी करण्यासाठी गेले असता दुकानातील दप्तराची मागणी केली. पण दप्तर मिळून आलेच नाही.

त्यानंतर दप्तर मागूनही उपलब्ध केले नाही. त्यात धान्य पोहोच पावती, पंचनामा, चलन अधिकारपत्र, तपासणी करण्यासाठी दिले नाही. एप्रिल २०१८ पासून लाभार्थींना रोख मेमो वर धान्य वाटप करण्याचे निर्देश असतानाही बेकायदेशीर धान्य वाटप करून त्याचा अहवाल सादर केला नाही. त्यामुळे त्याच्या दुकानातील सर्व मुद्देमाल जप्त केला. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.