सुजय विखे म्हणतात, मला खासदार होण्यासाठी फिरण्याची गरज नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  तुम्ही लोकांची कामे वेळेत केली असती तर, मी इथे आलो नसतो. लोकांनी बोलावल्याने आरोग्य सेवेच्या माध्यमातून काम सुरू केले. या भागातील जनता अनेक दशकापासून विखे कुटुंबाशी जोडलेली आहे. आमच्या कामाच्या माध्यमातून जनतेने आम्हाला स्वीकारले आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी केले. तालुक्‍यातील माहीजळगाव येथे जनसेवा फाऊंडेशन आयोजित आरोग्य शिबीर समारंभात ते बोलत होते. 
Loading...

विखे पुढे म्हणाले, 21 व्या आरोग्य शिबिरात अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. आजपर्यंत झालेल्या आरोग्य शिबीरात 25 हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. लोकांची दुःख मला चांगली समजतात. आजारांच्या उपचारांसाठी मोठा खर्च येतो. सामान्य माणूस हा खर्च करू शकत नाही. त्यामुळे रुग्णसेवेचे व्रत हाती घेतले आहे.

मला खासदार होण्यासाठी फिरण्याची गरज नाही. विळदघाट हॉस्पिटलला राउंड मारला तरी मी खासदार होईल. मात्र येथील जनतेने बोलविल्याने मी आलो आहे. यावेळी कैलास शेवाळे, प्रवीण घुले, बापूराव गायकवाड यांची भाषणे झाली. प्रविण खेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दादा शिंदे यांनी सूत्रसंचालन तर, श्रीमंत कदम यांनी आभार मानले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.