पारनेर मध्ये शेतकऱ्यावर वाळूतस्करांनी केली दगडफेक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शेतात मोटार सुरू करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यावर वाळूतस्करांनी दगडफेक केली. ही घटना तालुक्यातील जवळा येथे (१ नोव्हेंबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली. नवनाथ गंगाधर सालके असे शेतकऱ्याचे नाव आहे. सालके हे गुरुवारी (१ नोव्हेंबर) रात्री ९ वाजेच्या सुमारास कोरपाडाचा डोह येथे विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता ते विहिरीकडे जात असताना त्यांच्या दिशेने वाळूतस्करांनी दगडफेक केली. 
Loading...

त्यातील एक दगड त्यांच्या हाताला लागला. त्यांनी रामदास घावटे यांना फोनवर हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. तेथे वाळूउपसा चालू होता. सालके व घावटे त्यांच्या मशिनकडे येत असल्याचे पाहून वाळूतस्करांनी तेथून पळ काढला. वाळूचोरांचा सुळसळाट पाहता त्यांच्यावर कारवाई करावी; अन्यथा महसूल प्रशासनाच्या विराेधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.