कांदा @ १४०० रुपये.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राहुरी बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल १२ हजार २३४ कांदा गोणीची आवक होऊन चांगल्या प्रतीच्या कांद्यास १४०० रूपये क्विंटल भाव मिळाला आहे.बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर कांद्याची आवक मंदावली असून गेल्या ८ दिवसांपासून भावही उतरले आहेत. 
Loading...

लिलावात विक्रीस आलेल्या कांद्याचे प्रतवारीनुसार भाव पुढीलप्रमाणे नंबर १ - १००० ते १४००, नंबर २ - ५०० ते ९९०, नंबर ३- १०० ते ४९०, गोल्टी कांदा ४०० ते ७०० या प्रमाणे विकला गेला. अपवादात्मक काही गोण्या १५०० ते १६०० रुपये विकल्या गेल्या. त्यात रविवारपासून पुढील तीन गुरूवार वगळता तीन लिलाव बंद राहणार आहेत. 


त्यात ४, ६ व ९ नोव्हेंबर यादिवशीचे कांद्याचे लिलाव बंद राहणार असून गुरूवारी, दि ८ नोव्हेंबर या दिवशी पाडवा असल्याने कांदा लिलाव सुरु राहील, असे बाजार समितीच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे. रविवार, दि. ११ नोव्हेंबरपासून कांदा लिलाव नियमित सुरु होतील, असे सभापती अरुण तनपुरे यांनी सांगितले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.