निवडणुकीच्या आधी शहरातील गुंडांच्या मुसक्या आवळणार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. मनपा निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून शहरातील गुंडांच्या मुसक्या आवळल्या जाणार असून त्यांना लवकरच हद्दपार केले जाणार आहे. निवडणूक कालावधीत शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी हे पाऊल उचलण्यात येणार आहे. 
Loading...

मनपा निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरातील अट्टल गुन्हेगार शहरातून हद्दपार होणार आहेत. विविध गुन्हे दाखल असणाऱ्या गुन्हेगारांची दोन दिवसांत यादी तयार करून संबंधित गुन्हेगारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. गुन्हेगारीमुळे नगर शहर व जिल्हा महाराष्ट्र राज्यात चर्चेचा विषय ठरलेला आहे. 


त्यामुळे पाेलिस व महसूल प्रशासनाने ही तयारी केली आहे. निवडणूक शांततेत पार पडावी म्हणून शहरातील गुंडांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहेत. केडगाव हत्याकांड पोटनिवडणुकीनंतर झाले होते. त्यामुळे नगर शहरातील मनपा निवडणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अट्टल गुन्हेगार आता शहरातून हद्दपार केले जाणार आहेत. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.