बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या दोघांना अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सुपारी घेऊन बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात सुपारी घेणारे आश्विन ऊर्फ गंगा संजय खुडे (वय २४, रा. रामवाडी, सर्जेपुरा, नगर), भीमा ऊर्फ अशोक राम गाडे (रा. सिद्धार्थनगर, नगर) या दोघांना एमआय़डीसी पोलिसांनी अटक केली आहे. एमआयडीसीतील आयटी पार्क येथे बांधकाम व्यवसायिक प्रशांत ऊर्फ संकेत भोर यांच्या अपघाताचा बनाव तयार करून हत्येचा प्रयत्न झाला होता. एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना सुपारी देऊन हत्येचा प्रयत्न झाल्याचा उघडकीस आले होते. 


Loading...
त्यानुसार नागापूर येथील रवींद्र बाल्या भीमराज भोर, चिरंजीव दत्तात्रय गाढवे हे सुपारी देणारे व सुपारी घेणारे आश्विन खुडे, भीमा गाडे यांच्या टोळीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. या टोळीतील एक आरोपी कृष्णा घाटविसावे व अमोल जिजाराम सावळे यांना पोलिसांनी अटक केली होती. या दोघांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार तपास करून खुडे व गाडे यांना गुरुवारी अटक करण्यात आली.


प्रशांत भोर याला मारहाण करण्यासाठी चिरंजीव गाढवे याने दीड लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यातील एक लाख रुपये रक्कम लगेच मिळाली होती. तर उर्वरित रक्कम काम झाल्यानंतर मिळणार होती. परंतु, ती रक्कम मिळाली नाही, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.