पालकमंत्री शिंदे आणि खासदार गांधी टक्केवारी खातात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कर्जत-जामखेडमध्ये एकही चांगला रस्ता नाही. कामे देतांना हे टक्केवारी घेतात आणि त्यांच्याच कार्यकर्त्यांना कामे देतात. यामुळे कामे दर्जेदार होत नाहीत, पालकमंत्री आणि खासदार हे टक्केवारी घेऊन कामे देत असल्याने कामे दर्जेदार होत नाहीत,' अशी टीका डॉ. सुजय विखे पाटील यांनी कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथे बोलताना केली.
Loading...

कर्जत तालुक्यातील महिजळगाव येथे आरोग्य शिबिर आणि पाटेगाव येथे विविध विकासकामांचे उद्घाटन सुजय विखे यांचे हस्ते झाले.यावेळी विखे म्हणाले की, 'पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे या भागातील माणसांशी जोडल्या गेलेल्या संबंधातून आणि कामातून जनतेने आम्हाला स्वीकारले आहे. त्यामुळे लादलेले नेतृत्व, अशी टीका कोणी करीत असेल तर त्याला आपण फार महत्व देत नाही. 


तालुक्यातील महिजळगाव येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या आरोग्य शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विखे पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधून आरोग्य शिबिराच्या आयोजना मागील भूमिका स्पष्ट केली.

 या शिबिरांचा राजकीय भूमिकेतून आपण उपयोग कधीही केला नसल्याचे त्यांनी सांगितले. या २१व्‍या आरोग्‍य शिबिरात २५०० रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली. आजपर्यंत झालेल्‍या आरोग्‍य शिबिरात ३० हजार रुग्‍णांची तपासणी करण्‍यात आली, असल्‍याचे डॉ. विखे यांनी सांगितले.

विखे म्हणाले, 'राजकारणात सर्वात चांगले शिक्षण घेतलेला मी तरूण आहे. त्यामुळे लोकांची दुःख मला चांगली समजतात. आज कोणत्याही शारीरिक आजारांसाठी मोठा खर्च येतो. सामान्य माणूस हा खर्च करू शकत नाही.


अशा माणसांना प्राथमिक तपासणीतून मार्गदर्शन व्हावे, पुढील उपचारांसाठी दिशा मिळावी, हा सामाजिक दृष्टीकोन माझा आहे. पण आमचे राजकीय हितचिंतक या उपक्रमाकडे राजकीय हेतूने पाहात असतील तर दुर्दैव असल्याची खंत व्यक्त केली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.