तुम्ही निवडून दिलेला गडी काय करतोय, हे एकदा बघा - माजीमंत्री पाचपुते.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- २०१४ मधील निवडणुकीत मला पाडण्यासाठी पदाच्या लालसेपोटी तालुक्यातील काही मंडळी एकत्र आली. प्रत्येकाला वेगवेगळी पदे मिळाली, पण सत्तेसाठी जे एकत्र आले, त्यांनी सामान्य जनतेला काय दिले? 


Loading...
उलट वाऱ्यावर सोडले, असा आरोप माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी केला. शेडगाव येथे जिल्हा परिषद सदस्य पंचशिला गिरमकर यांच्या स्थानिक विकास निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी बोलताना पाचपुते म्हणाले, मी तालुक्याचा आमदार नसलो, तरी सरकारदरबारी जाऊन विकास निधी आणण्याचे काम केले, म्हणून जनता माझ्याबरोबर आहे. संकटांवर मात करून साईकृपाचे दोन्ही साखर कारखाने सुरू केले. 

चार वर्षे विरोधकांनी त्रास दिला. माझ्या घरासमोर दशक्रिया विधी, मुंडण, पोतराज, काळे झेंडे दाखवून आंदोलने लोकांना पैसे देऊन करायला लावली, पण मी डगमगलो नाही. हत्ती जरी म्हातारा झाला, तरी त्याचे वजन कमी होत नाही. 


जनतेत राहून कामे करावी लागतात. जनतेच्या हितासाठी मी मुख्यमंत्र्यांना भेटून वीज, रस्ते, पाणी यासाठी निधी आणला. पण तुम्ही निवडून दिलेला गडी काय करतोय, हे एकदा बघा. 

दुसऱ्यासाठी खड्डा खोदायला निघाले होते, तेच आता कुकडी साखर कारखान्याला अडचणीत आणून खड्ड्यात चालले आहेत, असा आरोप पाचपुते यांनी आमदार राहुल जगताप यांचे नाव न घेता केला. 

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.