धक्कादायक : काँग्रेस कार्यकर्त्यास शिवसेनेच्या नेत्याकडून मारहाण !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर काँग्रेस कार्यकर्ता व त्याच्या आईला शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करत दागिने लंपास केल्याची तक्रार घारगाव पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. शाळेतील मुलींची छेडछाड केल्याप्रकरणी समज दिल्याचा राग मनात धरुन शिवीगाळ करत तलवारीने हल्ला केल्याची तक्रार आहेर यांच्या सहकाऱ्यांनी दिली आहे. 


Loading...
यासंदर्भात शाळा आणि ग्रामपंचायतीनेदेखील संबंधितांविरोधात तक्रार केली आहे. शंभुराजे विठ्ठलराव आहेर आणि युसूफ दादा चौगुले यांनी दिलेल्या परस्परविरोधी तक्रारीवरुन दोन्ही गटांविराेधात गुरुवारी रात्री गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते. 

शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेर यांच्याविरोधात दिलेल्या तक्रारीत चौगुले यांनी म्हटले आहे, जि. प. कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे यांच्या कार्यालयात काम करत असून बुधवारी रात्री मयूर आहेर, शंभुराजे आहेर यांनी फोन करत घारगावच्या शेरे पंजाब हॉटेलजवळ बोलावून घेत जनार्दन आहेर यांना क्रॉस करु नकोस, त्यांनी तुला मारण्यास सांगितले आहे अशी धमकी दिली. 


गुरुवारी सकाळी घारगाव स्टँडवर सौरभ विघे व शंभु आहेर यांच्यात झालेले भांडण मिटवल्यावर गावात गेलो असता जनार्दन आहेर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लाथाबुक्क्याने मारहाण केली. गळ्यातील पावणेतीन तोळ्यांची साखळी गायब झाली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या आईलादेखील मारहाण झाली. 


तिच्या गळ्यातील गंठण तोडून घेतले. आहेर यांच्यासह शंभुराजे आहेर, योगेश आहेर, संतोष कान्होरे, मयूर आहेर यांच्याविरोधात तक्रार दिली. दुसऱ्या तक्रारीमध्ये शंभुराजे आहेर यांनी म्हटले आहे, सौरभ विघे, जब्बार चौगुले, युसूफ चौगुले हे गावाजवळील शाळेत येणाऱ्या मुलींची टिंगल करताना दिसल्याने त्यांना समज दिली असता सौरव विघेने वाद घालून शिवीगाळ केली. 

कारमधून तेथे आलेल्या जब्बार चौगुले याने तलवारीने केलेला वार चुकवत तेथून पळत गावात येत याची माहिती आहेर यांना दिली. आहेर समजावून सांगत असताना चौगुले याने भाेसकून ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी दोन्ही गटांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल केले.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.