शिवसेनेच्या मंत्र्यांनी शहरात प्रचारासाठी येणे टाळले.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता सुरू झाली आहे. भाजपने प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत प्रचाराचे रणशिंग फुकले. परंतू शिवसेनेच्या प्रचाराचा नारळ आता कधी फुटणार याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेच्या वरिष्ठपातळीवरील नेते अद्यापही फिरकले नाही. 


Loading...
त्यामुळे स्थानिक नेत्यांवरच प्रचाराची भिस्त दिसत आहे. शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यावर ही जबाबदारी दिसत आहे. या निवडणुकीची शिवसेनेने चार मंत्र्यांवर जबाबदारी टाकली होती. परंतू त्यापैकी अद्यापही एकही मंत्री शहरात आला नाही. पर्यावरण मंत्री रामदास कदम, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, गुलाबराव पाटील यांच्यावर ही जबाबदारी आहे. पण एकही मंत्री आला नाही. 

आता प्रचारासाठी अवघे दहा दिवस बाकी आहे. या दहा दिवसात शिवसेनेचे वरिष्टपातळीवर कोणकोण हजेरी लावणार हे याबाबत उत्सुकता आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे हे त्यांच्या सुपुत्राच्या प्रभागात गुंतले आहे. त्यामुळे राठोड यांना प्रचाराची धुरा आता सांभाळावी लागणार आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.