पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स मध्ये सोन्याच्या बांगडयांची चोरी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  सर्जेपुराजवळ असलेल्या पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स या दुकानात येऊन दोन बुरखा परिधान केलेल्या महिलांसह एक दाढी वाढलेल्या पुरुषाने दुकानातील 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या चोरुन नेल्या. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Loading...
सोन्याचे दागिने खरेदी करण्यासाठी बुरखा घातलेल्या दोन महिला दुकानात आल्या. त्यांच्या समवेत एक दाढी वाढलेला पुरुषही होता. सोन्याचे दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानातील कामगाराला विविध प्रकारच्या सोन्याच्या बांगडयांची डिझाईन मागित्या. त्यानुसार कामगारानेही बांगडया दाखविल्यावर या कामगाराची नजर चुकवून त्यांनी 1 लाख 20 हजार रुपये किमतीच्या बांगडया लांबविल्या. 

रात्री दुकान बंद करण्याच्या वेळी सोन्याच्या दागिन्यांचा हिशोब लागला नाही. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा तपासल्यावर बांगड्या चोरल्याचे आढळून आले. त्यावरुन सुशांक सुरेश बरदे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.