विकासाची गंगा वाहण्यासाठी भाजपची सत्ता आवश्यक - खा. दिलीप गांधी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  भारतीय जनता पार्टी विकासाच्या मुद्यावर महानगरपालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात विकास कामे होत आहेत, असे प्रतिपादन खासदार दिलीप गांधी यांनी केले. 
Loading...

भाजपचे प्रभाग ६ चे उमेदवार स्थायी समिती सभापती बाबासाहेब वाकळे, रवींद्र बारस्कर, डॉ. आरती बुगे, वंदना ताठे यांचा प्रचाराचा प्रारंभ शहर जिल्हाध्यक्ष गांधी यांच्या हस्ते सावेडी गावठाण येथे मारुती मंदिरात श्रीफळ वाढवून झाला. 


भाजप जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, अॅड.अभय आगरकर, सावेडी मंडल अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, मोहन मानधना, बाळासाहेब वाकळे, विठ्ठल बारस्कर, दिलीप बारस्कर, अशोक वाकळे, जगन्नाथ बारस्कर, राजू बारस्कर, भानुदास बारस्कर, आशा कराळे, राजेेंद्र वाकळे, गजानन वाकळे अादी उपस्थित होते. 

गांधी म्हणाले, विकासाची गंगा नगरमध्ये वाहण्यासाठी महानगरपालिकेत भाजपची सत्ता येणे आवश्यक आहे. आता जनतेनेच निर्णय घेऊन विकासासाठी भाजपला उमेदवारांना निवडून द्यावे. 

----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.